अमित शहा यांच्या नावाने हरियाणाच्या मंत्र्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

154
crime

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बनून हरयाणाच्या मंत्र्यांकडून तीन कोटी रुपये लाटण्याच्या प्रयत्न करणाऱया दोघांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. उपकार सिंह आणि जगतार सिंह अशी दोघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांनी 20 डिसेंबर रोजी मंत्रीr रणजित सिंह चौधरी यांना व्हीओआयपी कॉल केला. आपण अमित शहा बोलत आहोत, असे सांगितले. पक्षात मोठे पद हवे असेल तर पक्षाशी संबंधित एका खात्यात रक्कम पाठवे, असे त्यांनी मंत्री चौधरी यांना सांगितले. चौधरी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींना अटक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या