हरयाणात मनोरंजक लढाई

397

हरयाणात विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होत असून येथील लढाई मनोरंजक ठरत आहे. भाजपने येथे आघाडी घेतली असली तरी बहुमताचा आकडयाचा पल्ला गाठणं कठीण आहे. तर काँग्रेसने जोरदार कमबॅक केलं असून जेजेपीही पुढे सरकत आहे. यामुळे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी जेजेपीची मदत घ्यावी लागणार आहे.

तर काँग्रेसच्या कमबॅकमुळे भाजप आणि मनोहर खट्टर यांची चिंता वाढली आहे.  दुसरीकडे काँग्रेसने सरकार बनवण्याचा दावा केला आहे. त्यातही महत्वाची बाब म्हणजे जननायक जनता पार्टीने  (JJP) मुख्यमंत्री पदाचा दावा करत काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान,या सगळ्या परिस्थितीवर मंथन करण्यासाठी खट्टर यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या