
सामना ऑनलाईन । चंदिगड
तामिळनाडूत निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेले हरियाणाचे पोलीस महानिरीक्षक हेमंत कलसोन यांना अरियालूर येथे हवेत गोळीबार केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. 2001च्या आयपीएस तुकडीचे हेमंत कलसोन यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक म्हणून तामिळनाडूत पाठविले होते. मद्याच्या नशेत असलेल्या कलसोन यांनी रविवारी अरियालूर येथे पोलीस कॉन्स्टेबलकडील सेमी ऑटोमॅटिक गन मागून घेऊन नऊ वेळा हवेत गोळीबार केला होता.

























































