हरयाणात जेजेपी आघाडीवर, खट्टर यांची गाडी अडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र- हरयाणा विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होत असून  महाराष्ट्रात शिवसेना भाजप महायुती आघाडीवर आहे. तर हरयाणात काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसने भाजपच्या मनोहर लाल खट्टर यांची डोकेदुखी वाढवली आहे. दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. मिनिटा मिनिटाला समीकरण बदलताना दिसत आहे.

आतापर्यंत 90 जागांपैकी 87 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात 40 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. तर काँग्रेस मात्र पिछाडीवर गेले असून 30 जागांवर पोहचले आहे. तर दुष्यंत चौताला यांची जेजेपी 8 जागांवर पुढे आहे. तसेच 9 जागा इतर पक्षांच्या खात्यात जात असल्याचे दिसत आहे.

हरयाणात खट्टर पुढे, सुरजेवाला पिछाडीवर आहे. तर दादरी जागेवर भाजपच्या बबीता फोगाट आघाडीवर आहेत. तर नरनौद येथे भाजपचे कॅप्टन अभिमन्यु पिछाडीवर आहे.