
सामना ऑनलाईन । चंदिगड
हरियाणामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी हरियाणातल्या कर्नालमध्ये 0 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गुरुग्राममध्ये 1.4 अंश सेल्सिअस, हिसारमध्ये 2.7 अंश सेल्सिअस आणि रोहतकमध्ये 3.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहाटे अनेक भागांमध्ये धुक्याचे साम्राज्य पसरल्याने रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
Karnal in #Haryana records 0 degrees Celsius today. Gurugram records 1.4 degrees Celsius, Hisar records 2.7 Degrees Celsius and Rohtak records 3.8 degrees Celsius
— ANI (@ANI) December 23, 2018























































