
आय फोन १४ या स्मार्ट फोनची तरुणाईमध्ये भलतीच व्रेझ आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर अनेक जण अनबॉक्सिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशातच राजस्थानातील एका तरुणाचाआय फोन १४ खरेदी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. कारण मोबाईल खरेदी करण्यासाठी तो चक्क दीड लाख रुपयांची नाणी घेऊन दुकानात पोहोचला. इतकी नाणी पाहून दुकानदाराचा पारा चढला. त्यांच्यात वाद सुरू झाला. अमित शर्मा असे या ग्राहकाचे नाव असून त्याने आपल्या यू-टय़ूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शेवटी अमितने आपण फ्रँक करत असल्याचे दुकानदाला सांगितले आणि ऑनलाईन पेमेंट करून मोबाईल खरेदी केला.




























































