श्रीलंकन बॉम्बस्फोट मालिका; मुख्याध्यापक, शिक्षकाला अटक

सामना ऑनलाईन । कोलंबो

ईस्टर सणावेळी झालेल्या आठ बॉम्बस्फोटांत मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केली आहे. या मुख्याध्यापक आणि शिक्षकाने नॅशनल तौहिद जमात या स्थानिक दहशतवादी संघटनेला मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. होरोवपठाना शहरातील अटावीरावेवा येथील  शाळेत मुख्याध्यापक नूर मोहम्मद अदू (56) आणि शिक्षक अजिबुल जाबर यांना विशेष कृती दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. या दोघांचे नॅशनल तौहिद जमात आणि आत्मघाती हल्ले घडवून आणलेला दहशतादी मोहम्मद शहरन हाश्मी याच्याशी होते, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, दंगेखोरांनी तोडफोड केलेल्या मशिदीमध्ये मुस्लिमांनी नमाज अदा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. सध्या बौद्धांचा सुरू असलेला सण आणि यादवीला 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.