4 ऑगस्टपासून आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा

318

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील आरोग्य विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या परीक्षांना 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्याचे आदेश दिले होते. हे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये अॅलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, नार्ंसग आदी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 18 ऑगस्टपासून सुरू होतील. लेखी परीक्षेनंतर तातडीने प्रॅक्टिकल घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या