Health Tips – नैसर्गिकरित्या वाढवा प्रतिकारशक्ती, ‘या’ पाच गोष्टींचे करा रोज सेवन

सध्या जगात कोरोना विषाणूचा हाहाकार अजूनही दिसून येत आहे. मात्र हिंदुस्थानमध्ये आता बऱ्याच गोष्टीत शिथिलता देण्यात आल्याने कामानिमित्त बाहेर जात असाल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक गोष्टींचे सेवन करण्यास सांगितले आहे. या गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या असून यातील काहींचा वापर आपण रोज आपल्या जेवणातही करतो. आयुरर्वेदात सर्व रोगांवर उपचार असल्याचे बोलले जाते आणि जगाला हिंदुस्थानने ही देणगी दिली आहे. आज आपण अशाच पाच प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोष्टींची तुम्हाला माहिती देणार आहोत.

1. हळद

images-10
हळद आपल्याकडे रोज जेवणात वापरली जाते. हळदीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणतत्व मुबलक प्रमाणात असतात. यात एंटी ऑक्सीडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेट्री गुण असल्याने शरीरासाठी हे लाभदायक ठरतात. दुधासोबत किंवा मध आणि कोमट पाण्यासोबत देखील हळदीचे सेवन करता येते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Health – ‘या’ पाच गोष्टींचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते क्षीण, झोपण्यापूर्वीची ‘ही’ सवय सर्वात घातक

2. तुळस

images-11
देशातील बहुतांश घराच्या बाहेर आपल्याला तुळस दिसते. याला शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणही आहे. तुळसीच्या पानांमध्ये एंटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण मुबलक असते. रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. तुळशीच्या पानांचे सेवन मधासोबत केल्यास प्रतिकारशक्ती वेगाने वाढते. तसेच अनेक प्रकारच्या काढ्यात याचा वापर आवर्जून केला जातो.

3. गुळवेल

images-12
कोरोना आल्यानंतर गुळवेल अधिक चर्चेत आले. गुळवेल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर याची मागणी वाढली. बाजारात गुळवेल कॅप्सूल किंवा ज्यूस स्वरूपातही उपलब्ध आहे. घरात याच्या पानांचा रस करूनही सेवन करू शकता.

4. आलं

images-13
चहा, भाज्या यांची चव वाढवण्यासाठी आलं (अद्रक) याचा रोज वापर केला जातो. सर्दी, खोकला किंवा हलका ताप असल्यास जुनी लोक तोंडात आलं ठेवून चघळण्यास सांगतात. याच्या तिखट रसामुळे घशाला अराम मिळतो. आलं प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यात एंटी बैक्टीरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सीडेंट गुण असल्याने याचे रोज सेवन करावे. मधासोबत आले खाल्ल्यास प्रतिकारशक्ती हमखास बुस्ट होते.

5. अश्वगंधा

images-14
कोरोना काळात अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आयुर्वेदात अश्वगंधा अनेक रोगांवर जालीम उपाय म्हणून वापरले जाते. दुधासोबत अश्वगंधा वनस्पतीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रात्री झोपताना हा प्रयोग केल्यास झोप चांगली लागते आणि पुरेशी झोप झाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.

(आयुर्वेदिक औषधांचे सेवन करण्यापूर्वी एकदा आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या)

आपली प्रतिक्रिया द्या