टिप्स – दाणेदार मिरी

  • सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्यास मधासोबत काळय़ा मिऱयाच्या चूर्णाचे सेवन करावे.
  • कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी काळय़ा मिरीचे चूर्ण गरम पाण्यात उकळवून मधासह प्या. हृदयरोगाची समस्या असणाऱयांनी काळय़ा मिऱयाचे सेवन करा.
  • भूक कमी लागत असल्यास काळी मिरी आणि गुळाचं मिश्रण तयार करून खा. त्यामुळे भूक लागेल.
  • गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास लिंबाच्या रसामध्ये काळं मीठ आणि काळय़ा मिरीचे चूर्ण घालून चिमूटभर खा. आराम मिळेल.
  • हिरडय़ा दुखत असल्यास काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र मिसळून घ्या. हे चूर्ण मोहरीच्या तेलात मिसळून दात आणि हिरडय़ांना लावा. अर्धातास तसेच ठेवून नंतर तोंड धुऊन घ्या.
  • पोटात जंत झाले असल्यास काळय़ा मिऱयाबरोबर बेदाणे खाल्ल्यास या समस्येपासून लवकर सुटका होते.
  • केसात कोंडा झाला असल्यास दह्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर मिसळा आणि ती तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर केस थंड पाण्याने शॅम्पूने धुवा.
  • ताप येत असल्यास काळय़ा मिरीचा काढा घ्या. तसेच मलेरिया झाला असल्यास काळय़ा मिरीचं चूर्ण आणि तुळशीच्या रसामध्ये मध मिसळून पाणी प्यावं. त्यामुळे मलेरियाचा ताप लवकर बरा होतो.
  • उचकी थांबत नसल्यास काळय़ा मिरीच्या चूर्णात मध घालून हे मिश्रण चाटावं किंवा काळी मिरी तव्यावर जाळून त्याचा धूर घ्यावा.
  • काळी मिरी जास्त खाल्ल्यास पोटदुखी सुरू होते. त्यामुळे त्याचे अतिसेवनही करू नये.
आपली प्रतिक्रिया द्या