मास्क घातल्यावर डोकं दुखतं का? मग लगेच करा ‘हे’ उपाय…

कोरोनपासून बचावासाठी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना मास्क परिधान केल्यानंतर डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. तज्ज्ञांच्या मते, बराच वेळ मास्क परिधान केल्यास अधिकतर लोकांना हा त्रास जाणवतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मास्क घालणे टाळावे. आज आपण या समस्यावरील उपाय जाणून घेणार आहोत.

मास्क परिधान केल्यावर ‘या’ कारणामुळे होते डोकेदुखी

ज्या लोकांना सर्दी, खोकला, अ‍ॅलर्जी, दमा किंवा त्वचेवर पुरळ या सारख्या तक्रारी आहेत. त्यांच्यासाठी सतत मास्क परिधान करून राहणे कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, बराच काळ मास्क परिधान केल्याने Temporomandibular joint मध्ये (TMJ) वेदना होऊ शकते. तसेच हे तुमच्या खालील जबड्याच्या हाडाशी जोडते. मास्क घातल्यावर स्नायू आणि टिशूजची हालचाल करताना अडचण निर्माण होते. तेव्हा मज्जातंतू मेंदूला वेदनांचे संकेत देतो. ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

करा हे उपाय…

  • कानाला जास्त घट्ट बसणार नाही असा मास्क परिधान करा. यामुळे तुमची त्रासापासून सुटका होऊ शकते. तसेच यामुळे तुमचा कान दुखणार नाही आणि डोकेदुखी देखील होणार नाही.
  • जबड्याचे स्नायू आणि दातांमधील घट्टपणामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. तुमच्या जबड्याचे स्नायू आणि दात रिलॅक्स असले पाहिजेत. कारण हे विश्रांतीचे सूचक आहेत.
  • चुकीच्या पद्धतीने मास्क परिधान केल्यासही Temporomandibular joint मध्ये वेदना होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने मास्क परिधान केल्यास स्नायूंवर ताण वाढू शकतो. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा.
  • मेडिटेशन करा, तसेच हलक्या पद्धतीने मान हलवत स्ट्रेचिंग करा. तसेच गालासोबत कपाळावर हलक्या हातानी मालिश करा.

दरम्यान, अनेक जण कोरोना लसीचे दोन डोस घेल्यानंतर घरातून बाहेर निघताना मास्क परिधान करण्यास टाळाटाळ करताना आढळत आहेत. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अजूनही कोरोनाचे सावट असल्याने घरातून बाहेर निघताना आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करा.

आपली प्रतिक्रिया द्या