टिप्स – शेंगदाणे

 • शेंगदाणा शरीरासाठी अत्यावश्यक असणारे खनिज, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेलेनियम याचा चांगला स्रोत आहे.
 • शेंगदाणे खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच शरीराला हृदयाच्या अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.
 • शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे यांच्या नियमित सेवनाने गॅस आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो.
 • सांधेदुखीचा त्रास असल्यास भिजलेले शेंगदाणे आणि गूळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.
 • शेंगदाण्यातील मॅगनिज रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतो.
 • रक्ताची कमतरता असल्यास शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते.
 • शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.
 • शेंगदाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.
 • शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.
 • शेंगदाण्यात ऍण्टिऑक्सिडंट भरपूर असतं. ज्यामुळे शेंगदाणे नियमित खाण्यामुळे पोटाचे आजार आणि आतडय़ांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
 • शेंगदाण्यामधील पोषक तत्त्वामुळे तुम्हाला ताणतणावाचा त्रास कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढते.
आपली प्रतिक्रिया द्या