370 कलमप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते तेहसीन पूनावाला यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एम. आर. शाह आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी हटवली जावी तसेच फोन, इंटरनेट आणि वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटवली जावी अशी मागणी पूनावाला यांनी आपल्या याचिकेत केली आहे.