सदावर्तेंचे काय होणार? आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सिल्व्हर ओक’ हल्लाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आठ आरोपींना उद्या बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तपासाच्या अनुषंगाने आम्ही सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मागू, असे एका अधिकाऱयाने सांगितले. परंतु कोर्टाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यास सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेतील. ताबा वॉरंट घेऊनच सातारा पोलीस कोर्टात हजर राहणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, हल्लाप्रकरणी गावदेवी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली. हे चार व न्यायालयीन कोठडीत असलेले अन्य चौघे अशा आठ आरोपीना पोलिसांनी आज गिरगाव कोर्टात हजर केले होते. कोर्टाने त्या आठही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सोमवारी गिरगाव कोर्ट परिसरात एफबी लाईव्ह करत असलेल्या सचिदानंद पुरी याला पोलिसांनी  अटक केली.  त्यानंतर सदावर्तेंचा ड्रायव्हर राम कातकडे तसेच संकेत नेहरकर, रमेश गोरे या तिघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या.