
अतिरिक्त एजीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी व्होडाफोन-आयडियाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने 13 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायाधीश के. विनोद चंद्रन यांचे खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार होते. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विनंती केली की, पुढील सोमवारपर्यंत याचिकेवर सुनावणी करण्यास स्थगिती द्यावी. सुप्रीम कोर्टाने तुषार मेहता यांची विनंती मान्य केली.