गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीत पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं असून, 10 दुकाने पाण्याखाली आली आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाचा वेग कायम असल्यानं पूर ओसरण्याची कुठलीच शक्यता नाही. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना लगेच हलवण्यास सुरुवात केली आहे. या पावसाळ्यात पाचव्यांदा या नदीला पूर आला आहे.