
सामना प्रतिनिधी। बीड
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्हयात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला आहे.
पाऊस लांबल्याने ठप्प पडलेल्या खरीप पेरणीला वेग आला असून कापसालाही जीवदान मिळाले आहे. सात ते आठ टक्के क्षेत्रामध्ये मृग नक्षत्राच्या पावसावर कापूस लागवड करण्याचे धाडस केले होते. त्याला यश मिळाल्याचे शेतकरी बोलत आहेत. पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून टप्प्या टप्प्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस पडत आहे.

























































