मालवणात पावसाची संततधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। मालवण

मालवणात पावसाचा जोर रविवारी तिसऱ्या दिवशी होता. दिवसभरात ९१ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मानसूनच्या सुरूवातीलाच तीन दिवसात मालवणात एकूण ६८४ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. अशी माहिती मालवण तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली.

मालवण तालुक्यात अतिवृष्टिमुळे ६७ हजार ९२० रूपयाचे नुकसान झाले आहे. तर संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहे. मालवण देवली गावातही दरड कोसळली आहे.

मानसूनच्या सुरूवातीलाच मालवणला पावसाने झोडपून काढल्याने आंब्याच्या झाडांबरोबरच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आंब्याची झाडांची पडझड झाली आहे. मालवण देवली येथील अंबरनाथ मनोहर बावकर यांच्या घराची भिंत कोसळून १०हजार रूपयाचे नुकसान झाले. धामपुर गोड्याची वाडी येथील अशोक विट्ठल साळसकर यांच्या घरावर दरड कोसळल्याने घराची पडझड झाली आहे. देवली येथील रामचंद्र शांताराम चव्हाण यांचे चिंचेचे झाड व माडाचे झाड कोसळून ६६ हजार२२० रूपयांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला आहे. जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. यामुळे पर्यटकांना समुद्र किनारी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.