वक्रवृष्टी! पावसाचा 26 वर्षांतला महाविक्रम

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून मुसळधार बरसणाऱ्य़ा पावसाने मुंबईकरांची अक्षरशः दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते-रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. जोरदार पावसामुळे परळचा दामोदर हॉल बुडाला. काहींच्या घरात पाणी शिरले.

damodar-hall-waterlogg

पालिकेच्या नायर रुग्णालयातही पाणी शिरले. पावसाचा जोर इतका भयंकर होता की सप्टेंबरमध्ये तब्बल 26 वर्षांनी 24 तासांत पडलेला विक्रमी पाऊस ठरला. अतिवृष्टीमुळे पालिकेने आज तातडीने अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय, खासगी कार्यालये-कंपन्या बंद करण्याचे आदेश दिल्याने मुंबईकरांना सुट्टी मिळाली.

पावसाचे पाणी साठवण्यासाठी जमिनीखाली बोगदे – आदित्य ठाकरे

मुंबईत अतिवृष्टी असताना पावसाचे पाणी समुद्रात सोडावे लागते. मात्र भरती असल्यास हे पाणी समुद्रात सोडता येत नाही. अशावेळी हे पाणी साठवण्यासाठी भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी जागा शोधण्यात येत आहे अशी माहिती पर्यटन आणि उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

आपली प्रतिक्रिया द्या