चिपळूण, राजापुरात पूर; जिल्ह्यातील जनजीवन ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून चिपळूण आणि राजापूरातील पूरस्थिती कायम आहे.अनेक ठिकाणी दरडी कोसळून व पाणी भरून जनजीवन ठप्प झाले आहे.मदतकार्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे.पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यु झाला आहे.राजापूरात रानतळे येथे रस्त्याला तडे गेले असून रायपाटणलाही पुराचा वेढा बसला आहे. जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढल्या मुळे वहातूक बंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात एकूण 1081 मिमी तर सरासरी 120.11 मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद चिपळूण तालुक्यात 175 मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात 64 मिमी झाली आहे.

गेल्या 24 तासात मंडणगड 130 मिमी, दापोली 130 मिमि, खेड 155 मिमि, गुहागर 79 मिमि, चिपळूण 175 मिमि, संगमेश्वर 97 मिमि, रत्नागिरी 64 मिमि, लांजा 104 मिमि आणि राजापूर तालुक्यात 147 मिमि पाऊस झाला आहे. मंडणगड तालुक्यात मौजे पेवे-म्हाप्रळ रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद केली. सा.बा. विभागाने दरड हटवून वाहतूक सुरु केली. मौजे डरी येथील बाळाराम धोंडू सानुग्रे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 40 हजार रुपयांचे नुकसान, मौजे बहिरवली येथील विजय सोडकोजी साळवी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 5 हजाराचे नुकसान, मौजे लोकरावण येथील पांडूरंग सखाराम कोस्तूरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 60 हजाराचे नुकसान, मौजे भोगळोली येथील महेंद्र तानू लोंखडे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 24 हजार 300 रुपयांचे नुकसान, मौजे इस्मापूर येथील नथुराम सदनंदा वेदपाठक यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 लाख 40 हजाराचे नुकसान झाले आहे.
खेड तालुक्यात मौजे खोपी वेरळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद होती. सा.बां. विभागाने झाड हटवून वाहतूक सुरु केली. मौजे खेड येथे पावसामुळे 10 अंदाजे घराचे अंशत: 32 लाख 7 हजार 44 रुपयांचे नुकसान, मौजे कसबा-नातू ग्रामपंचायत चे पावसामुळे अंशत: 1 लाख 50 हजाराचे नुकसान, मौजे बोरघर येथे 7 घरामध्ये पाणी शिरल्याने घराचे पावसामुळे अंशत: 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

चिपळूण तालुक्यात मौजे आडेपूल ते अंधरला रोड पाणी असल्याने वाहतूक बंद केली होती पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मौजे अडखळ -अलोरे रस्ता समुद्राच्या लाटामूळे खचल्याने वाहतूक बंद केली आहे. मौजे चिपळूण येथील रविंद्र गंगाराम पानगले यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान , शंकर दौलत पानगले यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान, मौजे टेटव येथील किसन वसारकर यांच्या अंगावर भिंत पडून किरकोळ जखमी झाले. मौजे बहादूरशेख नाका येथील महादेव चव्हाण हे पाण्यात वाहून मयत झाले.

गुहागर तालुक्यात मौजे वरचा पाट येथे अशोक पावसकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 8 हजार 400 रुपयांचे नुकसान, मौजे दवगड येथील विनोद दत्त सकपाळ रु. 2 हजार, सुनिता गणपत घाणेकर रु. 2 हजार, संजय महादेव घाणेकर रु. 2 हजार, सावित्री महादेव घाणेकर रु.2 हजाराचे अशंत: नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात मौजे संगमेश्वर येथील सखाराम रामचंद्र कदम यांच्या घराचे पावसामुळे 11 हजार156 रुपयाचे नुकसान, मौजे नवेलेवाडी येथील सुरेश मानका नवेले यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 3 हजार 920 रुपयांचे नुकसान, मौजे निवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वर झाडाची फांदी पडून 3 हजार 210 रुपयांचे नुकसान, मौजे कर्ळी येथे दत्तराम बाबूराव चाळके यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 5 हजार 370 रुपयांचे नुकसान, विजय राघोजी रावगंण यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 10 हजार 910 रुपयांचे नुकसान, मौजे देवळे येथील डोंगर खचल्याने धोंडू नारायण खेडगळे यांच्या बागयतीचे अंशत: नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यात मौजे रत्नागिरी येथील धनजीनाका जवळील इमारात कोसळली, इमारतीत कोणी रहिवाशी नसल्याने जिवीत हानी नाही. मौज रहाटघर येथे वैभव प्रल्हाद खेऊर यांच्या घराचे पावसामुळे 15 हजार रुपयांचे, सुनिल गोविंद खेऊर यांच्या घराचे 15 हजाराचे, राजेश विकास पटवर्धन यांच्या घराचे 2 लाख 34 हजाराचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे मिऱ्या येथील पावसामुळे विजय विष्णू नार्वेकर रु. 52 हजार 600, अनता नार्वेकर रु. 6 हजार 500, मिलीन नार्वेकर रु. 18 हजार, योगीता विष्णू नार्वेकर रु. 5 हजार 400, संजना नितीन मिट रु. 39 हजार 200 र, दिंगबर मिट रु. 7 हजार 940 , देवंद्र नार्वेकर रु. 13 हजार 400, श्रीम. केळवट रु. 3 हजार 700, किरण नार्वेकर रु. 13 हजार 900, दिलीप नार्वेकर 60 हजार, करधेडकर र्फ. 13 हजार 400 नुकसान झाले आहे. मौजे खाणू येथील सुरेश प्रभाकर रसाळ यांच्या विहीरीचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे.

लांजा तालुक्यात मौजे बौध्दवाडी येथे दरड कोसळल्याने सदर ठिकाणी सा.बां . विभागाने दरड हटविण्याचे काम चालू आहे. जिवीत हानी नाही. मौजे वेरळ येथे रवळनाथ मंदिराची भिंत कोसळली, जिवीत हानी नाही.

राजापूर तालुक्यात मौजे पाथर्डे येथे व्यंकट मारुती घुले हे वहळावर वाहून गेल्याने मयत व गोविंद बालजी दहीफळे व व्यंकट लक्ष्मण शिरसाट हे जखमी झाले असल्याने जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.