संगमेश्वरमध्ये जोरदार पावसाने भातशेतीचे नुकसान; शेतकरी चिंतेत

संगमेश्वरमध्ये आठवड्याभरापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, मध्येच पडणाऱ्या मुसळधार सरींनी दाणादाण उडवली आहे. शहरासह गावागावातही पावसाची जोर वाढत आहे. पावसाने हळव्या भातशेतीची कापणी खोळंबली असून शेतकरी चिंतेत पडला आहे. जोरदार पावसाने भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची श्यक्यता आहे. लांजा तालुक्यात भांबेडमध्ये वहाळाशेजारी भातशेतीत पुराचे पाणी घुसले. भांबेड (ता. लांजा) येथे भातशेती आडवी झाल्याने सुमारे एक हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 64 हजार हेक्टरवर भात लागवड असून हळवी म्हणजेच 105 दिवसांनी तयार होणारे भाताचे सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील तीस टक्के भात कापणीयोग्य झाला आहे. मात्र, गेले आठवडाभर पावसाने म्हणावी तशी उघडीप दिली नसल्यामुळे कापणीला सुरुवात झालेली नाही. आता जोरदार पावसाने हळव्याची भातशेती पावसात आडवी होण्याची भिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या