सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस, मतदानावर पावसाचे सावट

1359

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई ठाण्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. परंतु सातारा कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पावसामुळे उद्याच्या मतदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेले तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या सभा भर पावसात सुरू होत्या. तर अनेकांनी पावसामुळे आपल्या सभा रद्द केल्या होत्या. आता सातारा आणि कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक थांबवण्यत आली होती. पाणी ओसरल्यावर धिम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणीही घुसले होते.

आपली प्रतिक्रिया द्या