परतीच्या पावसाने लातूरकर सुखावले, मांजरा प्रकल्पातील मृतपाणीसाठ्यात मोठी वाढ

पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेल्या लातूर जिल्ह्यास पुन्हा एकदा परतीच्या पावसाने हात दिला आहे. मांजरा प्रकल्पातील मृतपाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे पाणी संकट कमी होणार आहे. जिल्ह्यात 24 तासात 61.71 मि.मी., सरासरी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात अनेक मंडळात अतिवृष्टी झाली असून नदी, नाले, तुडूंब भरून वाहत असलेले दिसून येत आहे. या पावसाने लातूरकर सुखावले आहेत.

लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण प्रांरभी खूपच कमी होते. शेवटी शेवटी होत असलेल्या पावसाने जिल्ह्याचे पाणी टंचाईचे संकट बNयाच प्रमाणात दुर केले आहे. जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 61.71 मि.मी., पाऊस झालेला आहे. लातूर तालुक्यात 48.63 मि.मी., औसा तालुक्यात 47.43 मि.मी., रेणापूर तालुक्यात 37.25 मि.मी., उदगीर तालुक्यात 64.67 मि.मी., चाकूर तालुक्यात 68.60 मि.मी जळकोट तालुक्यात सर्वाधिक 167 मि.मी., निलंगा तालुक्यात सर्वात कमी 18.50 मि.मी., देवणी तालुक्यात 36 मि.मी., तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात 40.33 मि.मी., पाऊस झालेंला आहे. लातूर जिल्ह्यात गत 24 तासामध्ये मंडळ निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. लातूर तालुक्यातील लातूर 57 मि.मी., कासारखेडा 47 मि.मी., गातेगाव 60 मि.मी., तांदुळता 51 मि.मी., मुरुड 20 मि.मी., बाभळगाव 61 मि.मी., हरंगुळ बु. 36 मि.मी चिंचोली ब.57 मि.मी., पाऊस झालेला आहे.

औसा तालुक्यातील औसा मंडळात 88 मि.मी., लामजना 30 मि.मी., किल्लारी 8 मि.मी., मातोळा मंडळात 94 मि.मी., भादा 30 मि.मी., किनीथोट 25 मि.मी., बेलकुंड 57 मि.मी., रेणापूर तालुक्यातील रेणापूर मंडळात 50 मि.मी., पोहरेगाव मंडळात 43 मि.मी., कारेपूर मंडळात 34 मि.मी., पानगाव मंडळात 22 मि.मी., उदगीर तालुक्यातील उदगीर मंडळात 56 मि.मी., मोघा मंडळात 24 मि.मी., हेर मंडळात 140 मि.मी., देवर्जन मंडळात 48 मि.मी., वाढवणा बु. मंडळात 128 मि.मी., नळगीर मंडळात 145 मि.मी., नागलगाव मंडळात 80 मि.मी.,अहमदपूर तालुक्यातील अहमदूपूर मंडळात 67 मि.मी., किनगाव मंडळात 62 मि.मी., खंडाळी मंडळात 72 मि.मी., शिरुर ताजबंद मंडळात 56 मि.मी., हडोळती मंडळात 74 मि.मी., अंधोरी मंडळात 57 मि.मी.,चाकूर तालुक्यातील चाकूर मंडळात 64 मि.मी., वडवळ नागनाथ मंडळात 48 मि.मी., नळेगाव मंडळात 84 मि.मी., झरी मंडळात 36 मि.मी., शेळगाव मंडळात 111 मि.मी., जळकोट तालुक्यातील जळकोट मंडळात 135 मि.मी., घोणसी मंडळात 199 मि.मी., पाऊस झालेला आहे.

निलंगा मंडळातील निलंगा येथे 7 मि.मी., अंबुलगा बु. 28 मि.मी., कासारशिरसी 7 मि.मी., मदनसुरी 21 मि.मी., औराद शहाजनी 4 मि.मी., कासारबालकुंदा 10 मि.मी., निटूर 29 मि.मी., पानचिंचोली 42 मि.मी., देवणी तालुक्यातील देवणी बु. 49 मि.मी., वलांडी 25 मि.मी., बोरोळ 34 मि.मी., शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिरुर अनंतपाळ मंडळात 65 मि.मी., हिसामाबाद 21 तर साकोळ मंडळात 35 मि.मी., पाऊस झालेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या