
मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुढील 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.
काल पासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणीत एक स्कॉर्पियो गाडी वाहून गेली. सुदैवाने त्यातील प्रवाशांन वाचवण्यात यश आले.
31 Aug #पालघर, #ठाणे, #नवीमुंबई, #मुंबई, #रायगड, #नंदूरबार, #धुळे, #जळगाव, #नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता. पालघर नाशिक मध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज IMD, @RMC_Mumbaiने दिला आहे.
उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे ह्या भागात आहेत. pic.twitter.com/djwFobrbJu— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2021
हवामान विभागाने पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यात तीव्र मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
काल झालेल्या पावसामुळे चाळीसगाव, शेवगाव, डहाणू या भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगावमध्ये एनडीआरएफची टीमला पाचारण करण्यात आले असून अनेक ठिकाणी जनावरे आणि घरे वाहून गेली आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये घाटात दरड कोसळली होती. तर मराठवाड्यातील 67 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

































































