मुसळधार पावसाने पुण्याला पुन्हा झोडपले

524

मुसळधार पावसाने पुणे शहराला पुन्हा झोडपून काढले. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकटासह जोरदार कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरकांची अक्षरश वाताहात झाली. शहरात रात्री साडे आठ वाजेपर्यत 20.9 मिमी पावसाची नोंद झाली.
बुधवार पहाटे जोरदार पाऊस आला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र संध्याकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडांटासह मुसळधार पाऊस सुरु झाला आणि एकच गोंधळ उडाला. कार्यालयातून घरी परतणारे चाकरमाने रस्त्यातच अडकले. एक तासाच्या मुसळधार पावसाने शहर ठप्प झाले. शहरात बुधवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यत चोवीस तासात शिवाजीनगर येथे 10.2 मिमी, पाषाण येथे 50.3 मिमी, खडकवासला येथे 20 मिमी आणि लोहगाव येथे 63 मिमी पावसाची नोंद झाली.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या 50 पेक्षा अधिक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. कोथरुड, एरंडवणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाजवळ झाड कोसळले. सारसबागेजवळ झाड पडल्याने स्वारगेट, मित्र मंउळ चौक या परिसरात मोठी कोंडी झाली होती. आनंदनगर येथील चिंचणीकर रुग्णालयाजवळ झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

पुण्यावर 15 किलोमीटरचे ढग

पुणे शहरावर 15 किलोमीटरचे जास्त घनतेचे ढग जमा झाल्यामुहे कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडत आहे. हि एकप्रकारे ढगफुटीसदृश्य परिस्थती असून आणखी तीन दिवस मोठया पावसाची शहरात शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

वस्त्यांमध्ये शिरले पाणी

सहकारनगर, आंबिल ओढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राजेंद्रनगर, पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या वस्त्या आणि झोपडपटय़ांमधील घरांमध्ये पाणी शिरले. सायंकाळी आंबिल ओढय़ामध्ये पाणी वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले.

आपली प्रतिक्रिया द्या