शुक्रवार-शनिवार मुंबईत मुसळधार

79
rain

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुढील दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सकाळच्या वेळेत पाऊस कमी असेल, पण रात्रीच्या वेळी मात्र ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे. 26 आणि 27 जुलै रोजी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईपेक्षा रायगड आणि रत्नागिरी जिह्यात बुधवारी आणि गुरुवारी जोरदार पाऊस होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱयांची स्थिती असून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच गेल्या 24 तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. 24 आणि 25 जुलै रोजी कोकणातील काही भागांमध्ये अतिवृष्टीही होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या