
अमेरिकेत आलेल्या प्रचंड मोठ्या वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी शहर अक्षरशः पाण्यात बुडाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे सबवे, बस सेवा, रेल्वे सेवा ठप्प झाली. न्यूयॉर्क, न्यू जर्सी, वॉशिंग्टन आणि फिलाडेल्फिया येथील विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्यात आली. अवघ्या एका तासात झालेल्या 3 इंच म्हणजेच जवळपास 7.6 सेंटीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
न्यूयॉर्कमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे शाळेच्या बसेससह शेकडो वाहने पाण्यात अडकली. पुराच्या पाण्यामुळे ग्रँड सेंट्रल टर्मिनलसह मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेले. धुवाधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले. न्यूयॉर्कमधील सबवे स्टेशन पाण्याखाली गेले. रेल्वे ट्रकवर पाणी साचले. पाण्यामुळे एक्सप्रेस वे बंद करावा लागला. मुसळधार पावसाचा फटका विजेलाही बसला. न्यू जर्सीमधील 14 हजारांहून अधिक लोकांना विजेविना राहावे लागले. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी शहरात आणीबाणी जाहीर केली.






























































