उत्तरेत तुफान बर्फवृष्टी; दरडी कोसळल्या, भूस्खलनामुळे घरांची पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन दिवसांपासून उत्तरेत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, बर्फवृष्टीने अक्षरशः थैमान घातले आहे. जम्मूच्या रियासी येथे भूस्खलनामुळे कच्चे घर कोसळले. यात एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. आज रविवारी प्रचंड बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद राहिला. तर मुघल रोडवर हिमस्खलन झाले. यात सात ट्रेकर्स अडकले. यांत्रिकी विभागाने त्यांची सुटका केली.

पंजाब आणि हरयाणामध्ये पावसासह जोरदार गारपीट झाली. हरयाणातील 46 शहरांमध्ये जोरदार गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वारे तब्बल 60 ते 70 किमी वेगाने वाहत आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ, हरदा, ग्वाल्हेर येथेही मुसळधार पाऊस झाला.

पुढच्या 48 तासांत पंजाब, हरयाणा, दिल्लीसह उत्तर प्रदेशातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.