पूरग्रस्तांच्या मदतीला चाललेले हेलिकॉप्टर कोसळून तीन ठार

248

उत्तराखंडच्या उत्तर काशी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चाललेले हेलिकॉप्टर कोसळून बुधवारी तिघांचा मृत्यू झाला. पूर आलेल्या मोरी ब्लॉकमध्ये हे हेलिकॉप्टर चालले होते. विजेच्या तारांना धडक लागू नये यासाठी पायलट खबरदारी घेत होता. यावेळी नियंत्रण सुटून हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले.

उत्तर काशीच्या मोरी ब्लॉक परिसरात गेले काही दिवस पुराने हाहाकार उडाला आहे. येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पूरग्रस्तांना दैनंदिन जीवनातील वस्तू पुरवल्या जात होत्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच जेवणाची पाकिटे पोचवली जात होती. बुधवारी याच मदतकार्यातील हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलट कॅप्टन रजनीश लाल, को-पायलट शैलेश आणि स्थानिक नागरिक राजपाल या तिघांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या