नगरमध्ये हेल्मेट जनजागृती रॅलीत पोलिसांचा सहभाग

29

सामना प्रतिनिधी, नगर

दुचाकीस्वारांना हेल्मेटच्या उपयुक्ततेची जाणीव करून देण्यासाठी निघालेल्या रॅलीत पोलिसांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह अनेक पोलिसांनी हेल्मेट घालून दुचाकी चालवली.

फिनोलेक्स पाईप आणि गल्फ ऑईल यांच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते या रॅलीच शुभारंभ करण्यात आला. नगर शहरातील कापड बाजार, नेताजी सुभाष चौक, दिल्ली गेट मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर झाली. यावेळी पोलीस मित्र संघटनेतर्फे पोलिसांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं.

आपली प्रतिक्रिया द्या