हेल्मेट सक्तीचे उल्लंघन केल्याने कारवाई, उपप्रादेशिक कार्यालयाकडून मोहिम उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्वत्र दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आहे. दरम्यान अनेक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नसल्याने कराड उपप्रादेशिक कार्यालयाने कारवाई केली आहे. आठ दिवसात 150 दुचाकीस्वारांवर कारवाई केली असल्याची माहिती उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर कराडला लागून विद्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयं आहेत. या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरातली विद्यार्थी जात असतात. अनेक विद्यार्थी दुचाकीचा वापर करत आहेत. हे विद्यार्थी वाहन चालवताना वेगाची मर्यादा पाळल जात नाहीत. तीन सीट घेऊन प्रवास करतात, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करीत नाहीत. मोठ्या आवाजात हॉर्न वाजवला जातो आणि सायलेन्सर मोठ्या आवाजात करून नियमांची पायमल्ली केली जाते. या विरोधात येत्या दोन दिवसांमध्ये कराड उपप्रादेशिक कार्यालयाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

ज्या रिक्षांना सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा रिक्षांवर उपप्रादेशिक कार्यालयाकडून कारवाई होणार असून या रिक्षांची वयोमर्यादा 16 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा रिक्षा मालकांनी मुदत संपलेल्या रिक्षा चालवणे हे नियमबाह्य आहे. याचा विचार करून उपप्रादेशिक कार्यालयात याबाबत सहकार्य करावे. अन्यथा नाईलाजास्तव अशा रिक्षा चालकांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येणार आहे.

कराड शहरांमधून विविध वाहनांचा उपयोग करून नियमबाह्य प्रवासी वाहतूक केली जाते अशा तक्रारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. यामुळे लवकरच याबाबत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. कारण नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणे हे कायद्याने गुन्हा आहे. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.