मोदी फक्त ‘मन की बात’ करतात ‘काम की बात’ नाही, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी फक्त ‘मन की बात’ करतात ‘काम की बात’ नाही, असा टोला झारखंडचे मुख्यमंत्री हेमेंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदी यांना लागवला आहे. कोरोनाकाळात केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याबद्दल ट्विट करत सोरेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेच्यावेळी पंतप्रधानांनी आपल ऐकून घेतल नसल्याच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे. आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली. पण त्या ऐवजी ‘काम की बात’ केली असती आणि ऐकलीही असती तर बरं झालं असतं’, असा टोला त्यांनी ट्विट करत लगावला आहे.

केंद्राकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. मात्र, केवळ 2 हजार 181 इंजेक्शन देण्यात आली. बांगलादेशमधून रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्याची परवनागी मागितली होती. परंतु, त्यावरही काहीच उत्तर आले नाही, असे सोरेन यांनी म्हटले आहे.