Photo – ‘Heropanti 2’ मध्ये दिसणार सुपर अॅक्शन, ‘या’ जगप्रसिद्ध स्टंटमॅन सोबत बोलणी सुरू

हिरोपंती 2 (Heropanti 2) ने मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शुटींग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आता टीमने आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. चित्रपटाचे दुसरे शुटींग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ही टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

martin-ivanov

हिरोपंती- 2 शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील मुख्य अॅक्शन दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे कळते. तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून परफेक्ट लोकेशनचा शोध घेणे सुरू आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ अॅक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणे सुरू आहे. ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे, जे स्कायफॉल (2012), द बॉर्न अल्टीमेटम (2007) आणि द बॉर्न सुप्रमसी (2004) साठी ओळखले जातात.”hiropanti-tiger-shroff

सूत्रांनी पुढे सांगितले की, “रशियात जाण्याआधी सर्व क्रू मेंबर्सचे लसीकरण पूर्ण करण्याकडे साजिद सर काटेकोरपणे लक्ष देत आहेत.”

sajid

हिरोपंती या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा नाडियाडवाला यांनी टाइगर श्रॉफला धुव्वादार अॅक्शनसोबत जगासमोर आणले होते आणि आता हिरोपंती 2 मध्ये देखील चमकदार आणि स्टायलिश एक्शनचा जलवा पहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या