नागीण आलीय…..हे उपाय करा

शरीरातील उष्णता वाढल्याने ‘नागीण’ हा आजार होतो. या आजाराबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. नेमके नागीण म्हणजे काय… हा आजार का होतो याबाबत आपण जाणून घेऊया. 

शरीराला नागीण उठणे हा काय प्रकार आहे आणि तो कसा घालवावा? quara प्रश्नोत्तर मंचावर विचारलेल्या प्रश्नाला शकील जमादार यांनी उत्तर दिलेले आहे.

शरीराला नागीण उटणे म्हणजे हा एक त्वचाविकार आहे. आयुष्यातुन एकदा प्रत्येकाला हा विकार होतोच. हा रोग शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता वाढल्याने होते. मलादेखील नागीण उठली होती. खुप भयानक त्रास होतो. शरीरावर बारिक छोटे छोटे पाण्याचे पुरळ उठतात. प्रत्येक पुरळामध्ये सुई टोचल्यासारखे होते. दिवस रात्र झोप लागत नाही. याच्या वेदनेने अक्षरशः माणुस जमिनीवर लोळतो. नागीण रोग दिवसेंदिवस वाढत जातो… यासाठी मी एक आयुर्वेदिक उपाय केला त्याने माझी नागीण बरी झाली..

उपाय – तांदुळ घेऊन मिक्सरमध्ये त्याची बारिक पावडर बनवून घ्यायची. त्यानंतर त्या पावडरमध्ये थोडशे पाणी घालुन रबरबीत करुन घ्यायचे…आणि जिथे नागीणचे फोड उठलेत त्याठिकाणी त्या पावडरचा लेप लावावा..तो लावलेला लेप काही तासानंतर वाळतो तो काढुन टाकायचा पुन्हा तो लेप लावायचा असे दिवसातुन तीन ते चार वेळा लावावा. हा उपाय केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि नागीण बरी होते. सोबत त्वचाविकार डॉक्टरांना देखील दाखवून घ्या.

टीप – हे quora वर प्रसिद्ध झालेलं उत्तर आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घ्यावा. 

आपली प्रतिक्रिया द्या