
मिलिनियम रेस्टारंट आणि बारचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याचे मीरा रोड पोलीस उपायुक्तांचे आदेश उच्च न्यायालयाने स्थगित केले आहेत.
सुट्टीकालीन न्या. फरहान दुभाष यांच्या एकलपीठाने ही स्थगिती दिली. परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले आहे. या अपिलावर 30 नोव्हेंबरपर्यंत निर्णय द्यावा, असे निर्देश न्या. दुभाष यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
विभागीय आयुक्तांकडे होणारी सुनावणी तहपूब करण्याची विनंती बार मालकाने करू नये. या सुनावणीला सहकार्य करावे, असे न्यायालयाने नमूद केले





























































