
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलासाठी संपादित केलेल्या 3.7 एकर भूखंडावर एसआरए योजना राबवली जात असल्याने विद्यापीठाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने सुमारे तीनशे झोपडय़ांच्या पुनर्वसन योजनेला अंतरिम स्थगिती दिली.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर विद्यापीठाच्या याचिकेवर सुनावणी झाली. हे अत्यंत दुर्दैवी प्रकरण आहे, जेथे शिक्षणासाठी संपादित केलेल्या भूखंडावर झोपडय़ांचे अतिक्रमण झाले आहे. आता या झोपडीधारकांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून एसआरए योजना राबवण्यासाठी विकासकांची नेमणूक केली आहे.






























































