अबब! या देशात 50 लाखात येतात फक्त 5 टॉमेटो

1446

महागाई नियंत्रित असणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं असत. मात्र जेव्हा महागाई नियंत्रण बाहेर जाते तेव्हा अर्थव्यवस्था धोक्यात येते. सर्वाधिक महागाई असणार्‍या पहिल्या 50 देशांच्या यादीत हिंदुस्थान नाही. सध्या हिंदुस्थानातील महागाईचा दर चार टक्क्यांपेक्षा खाली आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जेथील महागाई दर हा जगात सर्वाधिक आहे. या देशात एक चपातीची किंमत 300 रुपये आहे. चला तर जाणून घेऊ कोणता आहे हा देश.

हा देश आहे ‘व्हेनेझुएला’. दक्षिण अमेरिका खंडातील एक चिमुकला पण खनिज तेलसमृद्ध देश. अमेरिकाप्रणीत भांडवलशाहीविरोधात उभा दावा मांडणाऱ्या दिवंगत माजी अध्यक्ष ह्य़ुगो चॅवेझ यांचा देश. सध्या हा देश तेथील महागाईमुळे चर्चेत आला आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृतानुसार, येथील महागाई दर हा 929789.5% टक्के आहे. येथे  5 टॉमेटोची किंमत 5 लाख बोलिव्हर (व्हेनेझुएलाचे चलन) इतकी आहे. येथे एक अमेरिकन डॉलर सुमारे 41,101 बोलिव्हर समतुल्य आहे. तर हिंदुस्थानचा एक रुपया येथे जवळपास 576 बोलिव्हर समतुल्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या