उच्च दाब वीज ग्राहकांसाठी महावितरणचे स्वतंत्र पोर्टल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्राहकसंख्या कमी असूनही सुमारे 60 टक्क्यांहून अधिक महसूल देणाऱया राज्यातील उच्च दाब औद्योगिक ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. त्यानुसार स्वतंत्र उच्च दाब ग्राहक पोर्टल (एचटी कन्झुमर पोर्टल)सुरू केले आहे.

महावितरणने सुरू केलेल्या या पोर्टलवरून संबंधित उच्च दाब औद्योगिक ग्राहकांना आपला कोणत्या वेळेस किती वीज वापर सुरू होता, सध्याचा वीज वापर पाहता महिनाभरात किती वीज बिल येईल याची माहिती सहजपणे या पोर्टलवरून मिळणार आहे. तसेच वीजपुरवठय़ाबाबतची तक्रार सहजपणे या पोर्टलच्या माध्यमातून महावितरणकडे करता येणार आहे. त्यावर महावितरणने केलेली कार्यवाही आदी माहिती सहजपणे मिळर्णीर आहे. तसेच बदललेला संपर्क क्रमांक, ई-मेल अद्ययावत करता येणार आहे.