
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात कार दरीत कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. भंजराडू-शहवा-भडकवास मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये सहा जण होते. शहवाजवळ चालकाचे अचानक नियंत्रण सुटले अन् कार दरीत कोसळली. पोलीस अपघातप्रकरणी सखोल तपास करत आहेत. मृतांपैकी पाच जण एकाच कुटुंबातील सदस्य होते. राजेश, हंसो, दीपक, आरती, हेमराज अशी मयत कुटुंबाची नावे आहेत. मयत सहावा व्यक्तीला या कुटुंबाने कारमध्ये लिफ्ट दिली होती.