
प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंग राजपूत याचा मृतदेह त्याच्या अंधेरी येथील राहत्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
आदित्यचा एक मित्र सोमवारी दुपारी त्याच्या घरी आला तेव्हा त्याला आदित्य बाथरुममध्ये पडलेला आढळला. त्याने बिल्डिंगच्या वॉचमेनच्या मदतीने आदित्यला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
आदित्य हा हिंदी टिव्ही सृष्टीतील नावाजलेला अभिनेता होता. त्याने 300 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच तो अनेक मालिकांमध्येही झळकलेला आहे. क्रांतीवीर व मैंने गांधी को नही मारा या चित्रपटात त्याने काम केलेले.



























































