लंडनमध्ये १६ वर्षांपासून सुरु असलेले हिंदुस्थानी रेस्टॉरंट बंद, पाकिस्तानींच्या छळवणुकीला कंटाळून मालकाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लंडनमध्ये गेली 16 वर्षे ‘रंगरेझ’ या अस्सल हिंदुस्थानी रेस्टॉरंटरने अनेकांची क्षुधाशांती केली आहे. परंतु हे रेस्टॉरंट आता कायमचे बंद होणार आहे. या रेस्टॉरंटचे मालक हरमन सिंह कपूर यांनी मनावर दगड ठेवून रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंट कायमस्वरुपी बंद करण्यात येणाचे पाऊल उचलण्यासाठी, त्यांनी पाकिस्तानींकडून होणारी छळवणूक आणि ‘ऑनलाइन हॅरासमेंट’ ही कारणे दिली आहेत.

त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक अतिशय मन विचल करणारी पोस्ट टाकली आहे. या पोस्ट अंतर्गत त्यांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला जात आहे. याची इंत्यभूत माहीती दिली आहे. विशिष्ट पाकिस्तानी गटांकडून गेल्या काही काळापासून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांच्या रेस्टॉरंट बद्दल खोटी माहिती पसरवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. या अशा पद्धतीमुळे त्यांच्या रेस्टॉरंटच्या मिळकतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्यांनी अखेर कंटाळून हे रेस्टॉरंट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कपूर केवळ इतकेच करुन थांबले नाहीत. तर रेस्टॉरंट बंद करण्यासाठी त्यांनी लंडनमधील ‘मेट्रोपॉलिटन पोलीस’ दलालाही चांगलेच सुनावले आहे. मुख्यतः त्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच अखेर त्यांनी कंटाळून हे लोकप्रिय रेस्टॉरंट अखेर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रंगरेझ’ने उत्तम चवीमुळे गेल्या सोळा वर्षांमध्ये अनेक हिंदुस्थानी खवैय्यांसह स्थानिकांची मने जिंकली होती. रेस्टॉरंट बंद होत असल्याचे कळल्याने, अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सदर घटनेवर आता नेटकरी उत्स्फुर्तपणे प्रतिक्रीया देऊ लागले आहेत.