
हिंगोली येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जितेंद्र साळी यांनी 20 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयातच झालेल्या एका पोलिसाच्या या आत्महत्येने चांगलीच खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये शस्त्रागार विभागात पोलीस कर्मचारी जितेंद्र साळी (45) हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. काम करत असताना साळी यांनी एसएलआर रायफलीतुन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना समजल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस कर्मचारी जितेंद्र साळी यांच्या आत्महत्येने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून साळी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे अद्याप समोर आले नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

























































