हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; चौंढी बहिरोबा, बिबथर व कोंढूर डिग्रस गावांचा संपर्क तुटला; दांडेगावातील शेत शिवारात पाणी शिरले, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार पाऊस जवळपास पाऊण तास बरसला. त्यानंतरही रात्री अधून मधून पाऊस सुरूच होता. मात्र पहाटेच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. पावसामुळे वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चौंढी बहिरोबा, बिथर या गावांचा संपर्क तुटला आहे. तर‌ अनेक घरांची पडझडही झाली आहे. कुरुंदा, पांगरा, वापटी या गावांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढूर डिग्रस या गावांचा संपर्क तुटला आहे, तर दांडेगावातील शेत शिवारासह नर्सरीमध्ये पाणी शिरले आहे.‌‌ पावसाची परिस्थिती लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवारात चिखल झाला आहे. अशा परिस्थितीत मागील काही दिवसांपासून अधूनमधून सारखाच पाऊस सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अचानक 9 वाजताच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास पाऊण तास बरसला. त्यानंतर रात्री अधून मधून पाऊस सारखाच सुरू होता. मात्र पहाटेच्या सुमारास पुन्हा अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चौंढी बहिरोबा, बिथर या गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक घरांची पडझडही झाली आहे. कुरुंदा, पांगरा,‌ वापटी या गावांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढूर डिग्रस या गावांचा संपर्क तुटला आहे. तर कुट्टी गावामध्ये वड्याचे पाणी शिरले आहे. दांडेगावातील नर्सरीसह शेत शिवारातही पाणीच पाणी झाले आहे.‌‌

जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शाळांना सुटी घोषित केली आहे. तसे आदेश त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना दिले आहेत. तसेच हा संदेश जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सॲपच्या ग्रूपवर तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.

मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईसापुर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या वरील बाजूस सुरू असलेल्या पावसामुळे आरओएस नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने 27 रोजी सकाळी 9 वाजता आणखी 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 13 दरवाजे अर्धा मीटरने चालू असून एकूण १३ दरवाजाद्वारे पैनगंगा नदीपात्रात 22062 क्युसेक्स (624709 क्युमेक्स) विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिएर कॅम्प येथील पुलावरून पैनगंगा नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळे कळमनुरी पुसद मार्ग बंद झाल्यामुळे मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.

Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली

सिद्धेश्वरमधून 9016 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने आज शनिवारी दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर धरणाचे 6 गेट 0.3 मी. ने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे धरणाचे एकुण 09 दरवाजे 0.3 मी. ने व 1 दरवाजा 0.61 मी. ने सुरू असून त्याद्वारे 9,016 क्यूसेक्स ( 255.302 क्यूमेक्स) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतरतेचा इशारा देण्यात आला आहे.

Latur News- लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट; नद्या-नाल्यांना पूर, रस्ते-पूल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प