‘एसटी’मध्ये लवकरच मोठी भरती

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात महामंडळाकडून 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यात येत असल्याने या गाड्या हाकण्यासाठी ‘एसटी’मध्ये चालक-वाहकांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.