
एचआयव्हीग्रस्त बालकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. लातूर जिह्यातील औसा येथे सेवालय बालगृह उभारण्यात येणार असून एम्पथी फाऊंडेशनच्या सहकार्याने हे बालगृह उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
औसा येथे एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात आले असून या इमारतीच्या कोनशिलेचे प्रातिनिधिक अनावरण नुकतेच राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. कोश्यारी यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करून सेवालय उभारण्यासाठी दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या कार्यक्रमाला एम्पथी फाऊंडेशनचे विश्वस्त रमेश दमाणी व प्रवीण छेडा, ‘सेवालय’चे संस्थापक रवी बापुटले उपस्थित होते.



























































