एक जगहा जब जमा हो तीनो…अनिल देशमुख यांनी केली दानवेंची बोलती बंद

anil-deshmukh

हे सरकार अमर अकबर अँथोनीचे अशी खोचक टीका करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, होनी को अनहोनी कर दे जब एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अँथोनी, अशा शब्दांत कडक प्रत्युत्तर देत दानवे यांची बोलतीच बंद केली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर अकबर अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल अशी फिल्मी स्टाईल टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरकठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात केली होती.  महाविकास आघाडीवर केलेल्या या टीकेचा समाचार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून याच पिक्चरमधील गाण्याच्या अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.

अनिल देशमुख यांचे ट्विट
महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर अकबर अँथोनी आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण होनी को अनहोनी कर दे..अनहोनी को होनी…एक जगह जब जमा हो तीनो.. अमर अकबर अँथोनी…असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या