
सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबई-ठाणेकर कुटुंबकबिल्यासह देवदर्शन व पर्यटनाला घराबाहेर पडले खरे… मात्र एकाच वेळी लाखो गाडय़ा रस्त्यावर आल्याने मुंबई-पुणे एक्प्रेसवे आणि मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळपासूनच ट्रफिकचा जांगडगुत्ता झाला. काही गाडय़ा भररस्त्यात अडकून पडल्याने यात भर पडली. खालापूर टोलनाका, बोरघाट, रायगड जिह्यातील इंदापूर व माणगावमध्येही वाहतूककोंडी झाली. दोन्ही ठिकाणी पाच ते सहा किमीच्या रांगा लागल्याने दोन तासांच्या प्रवासाला तब्बल पाच तास लागत होते.
शनिवार, रविवार आणि सोमवारी 26 जानेवारी असल्याने सलग सुट्टय़ा आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी तसेच खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी देवदर्शन व पर्यटनाचा बेत आखला. अनेकांनी भल्यापहाटे आपली स्कत:ची वाहने घेऊन तर कोणी खासगी लक्झरी बसने प्रकासाचा श्रीगणेशा केला. मात्र लोणावळा, पुणे आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या पर्यटकांना खालापूर टोलनाक्यावरच पहिला ब्रेक लागला. येथून बोरघाटात जकळपास अंडा पॉइंटपर्यंत मुंगीच्या पावलाने वाहने पुढे सरकत होती. त्यातच चढाकाकर क्लच प्लेट तुटल्याने अनेक कार आणि अकजड काहने भररस्त्यात नादुरुस्त झाल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन चार ते पाच किमीच्या रांगा लागल्या. काही बेशिस्त वाहनचालक आडव्या-तिडव्या गाडय़ा घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याने ट्रफिकचा गुंता अधिकच काढला.
बायपासचे काम लटकल्याने फटका
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 15 वर्षांपासून लटकले आहे. माणगाव-इंदापूर बायपासचे काम रडतखडत सुरू आहे. याचा फटका नेहमीच वाहनचालकांना बसतो.





























































