
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सणासुदीचा मोसम लक्षात घेता गृह आणि वाहन कर्ज स्वस्त करण्यासोबतच वैयक्तिक कर्ज फेडण्याची मुदतही वाढवली आहे. याशिवाय कर्जाच्या प्रोसेसिंग शुल्कात सवलत, प्री–अप्रुव्हड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ बँकेच्या ग्राहकांना घेता येणार आहे.
एसबीआयने आज अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यात सण–उत्सव काळात वाहन कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ, किमान व्याजदराने (8.70 टक्के) वाहन कर्ज, वेतनधारकाला कारच्या ऑन रोड किमतीतील 90 टक्के रकमेपर्यंतचे कर्ज, योनो वेबसाइटद्वारे अर्ज करणाऱया ग्राहकांना वाहन कर्जाच्या व्याजदरात 1 टक्का सवलत अशा घोषणांचा समावेश आहे.





























































