‘Honda’ कंपनी देतेय ‘या’ 3 मॉडेलवर अडीच लाखांपर्यंत बंपर ‘सूट’, जाणून घ्या कधीपर्यंत आहे मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची कंपनी होंडाच्या कार विक्रीत ऑगस्ट महिन्यात घसरण पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात होंडाने 7,509 कार विकल्या होत्या. गेल्यावर्षीपेक्षा यात 9.43 टक्के घसरण झाली. मात्र दुसरीकडे मारुती सुजूकी, हुंडाई मोटार्स आणि टाटा मोटर्सने दमदार कामगिरी केली. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे पुन्हा खेचण्यासाठी कंपनीने सप्टेंबर महिन्यात कारवर 2 लाख 50 हजारांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊया कोणत्या मॉडेलवर मिळतेय किती सूट….

1. होंडा अमेझ (Honda Amaze)

images-4
होंडाची सर्वाधिक विकली जाणाऱ्या ‘होंडा अमेझ’ या मॉडेलवर कंपनी 27 हजारांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. होंडा अमेझची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 6 लाख 10 हजार रुपयांपासून 9 लाख 96 हजारांपर्यंत आहे.

2. होंडा डब्ल्यूआर-व्ही (Honda WR-V)

images-5
Honda WR-V च्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेलवर सप्टेंबरमध्ये 20 हजारांपर्यंत सूट कंपनी देत आहे. कंपनीने जुलै 2020 मध्येच नवीन Honda WR-V लॉन्च केली होती. दिल्लीत याची एक्स शोरूम किंमत 8 लाख 50 हजार ते 11 लाख दरम्यान आहे.

3. होंडा सिविक (Honda Civic)

images-7
सर्वात बंपर सूट होंडाची सिविक मॉडेलवर मिळत आहे. याच्या पेटरकल मॉडेलवर सप्टेंबरमध्ये 1 लाखांपर्यंत रोख सूट मिळत आहे, तर होंडा सिविकच्या डिझेल मॉडेलवर तब्बल 2 लाख 50 हजारांपर्यंत रोख सूट कंपनी देत आहे. होंडा सिविकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 17 लाख 94 हजार ते 22 लाख 35 हजार दरम्यान आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या व्हेरिएंट आणि मॉडेलवर वेगवेग6 स्थानावर आणि डीलरशीपच्या आधारावर मिळणाऱ्या सूटमध्ये फरक असू शकतो. याबाबत जाणून घेण्यासाठी जवळच्या होंडा शोरूमशी संपर्क साधू शकता.