
हिंदुस्थानी स्वयंपाकघरात अशा पदार्थांचा समावेश असतो, ज्यांचे अनेक फायदे आहेत. यामध्येच मध आणि साखर हे रोजच्या वापरात येणार पदार्थ आहेत. साखर आणि मध हे दोन्ही पदार्थ फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यापासून तयार होतात. मधात अँण्टीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि मिनरल्स जास्त असतात. मधात औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. मधाचा वापर हजारों वर्षांपासून केला जातो. मधाचा वापर साखरेऐवजी केला जातो. बरेच जण आजही साखरेऐवजी मधाचा वापर करतात. मधामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे साखर आणि मध यापैकी काय गुणकारी आहे, असा प्रश्न अनेक जणांना पडतो.
साखर आणि मध दोन्ही फ्रुक्टोज आणि ग्लुकोजपासून बनलेले असतात. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात, तर साखरेमुळे शरीराला मधुमेहासह अनेक गंभीर आजार देऊ शकतात. जाणून घेऊया साखरेपेक्षा मध का चांगला आहे?
पोषक घटक
मधात अनेक पोषक घटक आणि अँण्टिऑक्सिडंटस् असतात, तर साखरेत प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट असतात. ज्यामध्ये पोषक तत्त्वांचा अभाव असतो. मधामध्ये अमिनो अॅसिड्स, एन्झाईम्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. मधामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जळजळ होण्याचा त्रास दूर होतो शिवाय जखमा लवकर भरून काढण्यासाठीही मध फायदेशीर ठरते.
कमी ग्लायसेमिक निर्देशांक
साखरेच्या तुलनेत मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. मधाचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पचनास उपयुक्त
मधात एंझाइम्स असल्यामुळे अन्नपचन सहजरीत्या होते. साखर रक्तात मिसळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
कमी कॅलरी
मध गोड असला तरी साखरेच्या तुलनेत त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे कॅलरी आणि गोडव्याकरिता मधाचा समावेश आहारात केला जाऊ शकतो.
एनर्जी बूस्टर
फ्रूक्टोज आणि ग्लुकोज यासारख्या नैसर्गिक शर्करा मधामध्ये आढळतात, ज्यांना प्रत्यक्षात एनर्जी बूस्टर मानले जाते. मध शरीरात सहजपणे शोषले जाते आणि त्वरित ऊर्जा प्रदान करते.
त्वचेसाठी फायदेशीर
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. मुरुमं, सूज यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मध गुणकारी आहे. जास्त साखर खाल्ल्याने ग्लायकेशनचा त्रास होऊ शकतो.